Ad will apear here
Next
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होत्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, मराठी चित्रपट शो, महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWMBK
Similar Posts
गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’ पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली.
‘अँग्लो उर्दू’ शाळेच्या प्रकल्पाची निवड पुणे : ‘शिक्षणाची वारी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईझ हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड पुणे विभागीय स्तरावर झाली आहे,’ अशी माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी ही माहिती दिली.
‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ पुणे : ‘मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला, तरीही त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली आणि हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला,’ अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language